H.-w

भाषासौंदर्य
'झाड म्हणजे काय' असा प्रश्न कुणाला विचारला, तर तो काय उत्तर देईल? काहीजण म्हणतील, 'झाड म्हणजे
गवत नव्हे, तर आणखी काहीजण म्हणतील, 'झाड म्हणजे वेल नव्हे'. खरंच झाड' म्हणताच आपल्या मनात काय
उभं राहतं ? ज्याची मुळं खोलवर जमिनीत गेली आहेत, ज्याला एक छोटा-मोठा बंधा आहे, अनेक शाखा म्हणजे
फाल्या आहेत आणि त्या शाखा हिरव्यागार पानांनी आणि रंगीबेरंगी फुलानी किंवा फळांनी बहरलेल्या आहेत, असंच
दृश्य मनासमोर येईल ना?
झाड, झुडूप, झाडोरा, वृक्ष, महावृक्ष अशी झाडसृष्टीची विविध नावं आपण ऐकतो. झाडाच्या आसपास
वाढलेली झुडपं तुम्ही पाहिलेली असतील, त्यांच रूप झाडाचंच असतं; पण अपेक्षित उंची, डौलदारपणा या गोष्टी
तिथं नसतात. 'झाडोरा' हा शब्द सहसा कधी येत नाही, तो 'झाडझाडोरा' असाच येतो. झाडझाडोरा म्हणजे एखादया
छोट्या-मोठ्या भूप्रदेशावरची सर्व प्रकारची झाडं अन् त्या भोवतीची झुडपं व अन्य वनस्पतिसंग्रह. गंमत म्हणजे
'झाडाचा वृक्ष झाला, की लगेच नपुंसकलिंगी असलेलं झाड पुल्लिंगी होतं. भरपूर उंची आहे, बुंधा चांगला जाडजूड
आहे आणि असंख्य फांदया-पानांनी डवरलेलं आहे, असं झाड दिसलं, की आपण त्याला 'वृक्ष' म्हणतो आणि
याहीपेक्षा आकारमानाने व उंचीने मोठं, दाटीवाटीने बहरलेलं आणि कित्येक वर्षांचं आयुष्य असलेलं असं जे झाड
असतं, त्याला 'महावृक्ष' म्हणतात.
संस्कृतमध्ये झाडासाठी 'तरु' हा शब्द आहे. तो आपण मराठीतही वापरतो. विशेषत: कथा-कवितांमध्ये हा
शब्द बरेचदा आढळतो.
हिरवीगार झाडं डोळ्यांना व मनाला शांतता देतात. झाडावर निरनिराळे पक्षी येतात. त्यांची छोटी-मोठी रूप
आल्हाददायक असतात. शिवाय झाड स्वतः अंगावर ऊन झेलून आपल्याला सावली देत असतं. तुम्ही तुमच्या
विज्ञानाच्या पुस्तकात वाचलंच असेल, की झाड दिवसा हवेतला कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात अन्
ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. इतकंच नव्हे, तर आपलं अवघं जीवनच वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं, म्हणूनच
प्रत्येकानं एक झाड लावून, त्याची निगा राखून, त्याचं संवर्धन करायला हवं.
(गंमत शब्दांची-डॉ.द.दि. पुंडे)


(write saranshlekhan of these paragraph)​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.