Questions


August 2023 2 10 Report
सुरुवाती सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे; पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या दोनशे वह्यांची चाळीस हजार पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, "हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचा! कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत." या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, "मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का?"

सतत दहा ते बारा वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला; पण तो लोकांना माहिती कसा व्हावा? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879 चा. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.