(३) खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. भारतातील लोकांमध्ये सौर ऊर्जा हा पसंतीचा पर्याय आहे. केवळ किमतीमुळे किंवा पर्यावरणीय घटकामुळे नाही, तर भारतात मिळत असलेल्या भरपूर सूर्यप्रकाशाच्या कालावधीमुळे अगदी हिमालयातही तापमान कमी असते परंतु सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी अधिक असतो. भारताचे मोक्याचे आणि अक्षांशाचे स्थान याबाबतीत अतिशय फायदेशीर आहे. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, वीज आणि इंधन यांचे दर सातत्याने वाढणार आहेत आणि त्यामुळे उर्जेचा पर्यायी व्यवहार्य उपाय करणे गरजेचे ठरणार आहे. आपल्या देशात बहुतांश भागांमध्ये विद्युतीतकरण झालेले नाही आणि वीज खंडीत होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे तिथे सौरऊर्जा हा पर्याय वरदान ठरणारा आहे. उत्तर: सौर उर्जा देशाच्या आर्थिक वाढीसाठी व कल्याणासाठी महत्त्वाचे साधन आहे. भारतासारख्या विकसनशील देशात विदयुत यंत्रणा सर्वदूर पसरलेली नसल्यामुळे सौर ऊर्जेशिवाय दूसरा पर्याय ही उपलब्ध नाही. वीज व इंधन यांच्या दरात वेळोवेळी वाढ होत चाललेली आहे. अशा वेळी सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनत चाललेली आहे.​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.